कला जगत

मालती इनामदार आद्यनृत्यांगणा पवळा हिवरगावकर लावणी सम्राज्ञी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

देवगड यात्रेत कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे पुढाकाराने गौरव

संगमनेर प्रतिनिधी / नितीनचंद्र भालेराव

श्री.क्षेत्र खंडोबा देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा येथे यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात होते.राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी तसेच आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांचा समृध्द कलेचा वारसा असलेल्या हिवरगाव पावसा कला नागरीत लोकनाट्य तमाशाचा मोफत कार्यक्रमांचे श्री.क्षेत्र खंडोबा देवस्थान ट्रस्ट वतीने आयोजन करण्यात आले होते.सदर यात्रा उत्सवा निमित्त तमशा क्षेत्रात प्रथम प्रदार्पण करणा-या आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी कला सम्राज्ञी पवळा कला मंच व महात्मा फुले, डॉ. आंबेडकर,राजर्षी शाहु विचार मंचाच्या वतीने लोक कलावंतांना दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी प्रसिद्ध लोककलावंत आणि लावणी सम्राज्ञी राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या मालती इनामदार यांना आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर लावणी सम्राज्ञी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मालती इनामदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून मध्ये तमाशा क्षेत्रात पाऊल ठेवले.त्यांनी महाराष्ट्रातील जत्रा,यात्रा, उत्सवानिमित्त विनोदी भूमिकेतून रसिकांच्या मनावर 46 वर्षे अधिराज्य गाजवले आहे.थडग्यातून उठली सून,
आई तुझं लेकरू,आता मला खुशाल फाशी द्या,मुंबईची केळीवली यासारखी अनेक पौराणिक,आध्यात्मिक,ऐतिहासिक, सामाजिक,धार्मिक विषयावरील वगनाट्ये महाराष्ट्रभर गाजली आहे. तमाशा क्षेत्रात लोककला जिवंत ठेवण्याचे कार्य यांनी केले आहे. त्यामुळे यांच्या तमाशा क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगांवकर यांच्या स्मरणार्थ जन्मगावी कला सम्राज्ञी पवळा कलामंच व महात्मा फुले,डॉ.आंबेडकर, राजर्षी शाहु विचार मंचाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

या प्रसंगी राजहंस दूध संघाचे संचालक डॉक्टर प्रमोद पावसे, शिवसेना (शिंदे) जिल्हा पदाधिकारी सोमनाथ भालेराव,
शिवसेना (उबाठा) संगमनेर तालुका प्रमुख भीमाशंकर पावसे,सामाजिक कार्यकर्ते सेवानिवृत्त शिक्षक बाबुराव पावसे,देवगड देवस्थानचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे,कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,
पोलिस पाटील मथाजी पावसे,
रोहिणी भालेराव,सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे,उपाध्यक्ष संतोष पावसे,
सचिव अनिल गडाख, खजिनदार गणेश शिंदे व विश्वस्त सोमनाथ पावसे यांच्या सह देवगड देवस्थान चे सर्व विश्वस्त,दीपक भालेराव,विकास दारोळे,समाधान भालेराव,साई भालेराव व इतर मान्यवरांच्या सह हिवरगाव पावसा ग्रामस्थ,
कला प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.