कला जगतसंगमनेर विशेष

अभिवाचक अनिल सोमणी यांना प्रज्ञावंत गौरव पुरस्कार जाहीर

संगमनेर (प्रतिनिधी)–निवृत्त नायब तहसीलदार तथा अभिवाचक व ज्येष्ठ रंगकर्मी अनिल सोमणी यांना अहिल्यानगर येथील आनंदोस्तव सेवाभावी ट्रस्टच्या वतीने यावर्षीचा प्रज्ञावंत गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

अनिल सोमणी हे संगमनेर साहित्य परिषदेचे सक्रिय सदस्य असून निवृत्तीनंतर त्यांनी अभिवाचनाच्या माध्यमातून वाचन चळवळ वाढवण्याचे मोठे काम हाती घेतले आहे. श्यामची आई , सह ८७ पुस्तकांचे अभिवाचन करून विविध ठिकाणी व्याख्याने दिले आहेत. सोशल मीडियाच्या काळात तरुणांना व नागरिकांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अभिवाचनाच्या माध्यमातून पुस्तकांची गोडी निर्माण करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. याचबरोबर काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात ते सेवा देत असून सातत्याने विविध कार्यक्रमांमधून त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अहिल्यानगर येथील आनंदोत्सव ट्रस्टच्या वतीने त्यांना यावर्षीचा प्रज्ञावंत गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार 25 फेब्रुवारी 2026 रोजी अहिल्यानगर येथील शानदार कार्यक्रमात त्यांना दिला जाणार आहे

निवृत्त नायब तहसीलदार यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल मा. महसूल व शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात, मा आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, प्रा डॉ.अनिल सहस्रबुद्धे, प्रा. नितीन भांड, यांसह संगमनेर मधील साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.