कृषीवार्ता

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बँक खात्यात १८०० कोटी होणार जमा; PM Kisan योजनेचा एकविसावा हप्ता वितरीत

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २१व्या हप्त्याचे वितरण झाले असून, ९० लाख ४१ हजार २४१ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २१व्या हप्त्याचे बुधवारी वितरण करण्यात आले. या योजनेंतर्गत राज्यातील एकूण ९० लाख ४१ हजार २४१ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १,९०९.२५ कोटी रुपयांची रक्कम जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी दिली. या नवीन २१व्या हप्त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना लागवड, बियाणे, उपजीविका आणि इतर कृषी खर्चासाठी आवश्यक असे तातडीचे आर्थिक बळ मिळणार आहे, असे ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना निश्चित वार्षिक उत्पन्न साह्य मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये डीबीटीमाध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा केली जाते.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.