ताज्या घडामोडीसंगमनेर विशेष
संगमनेरचे सुपुत्र डॉ. प्रणव पावसे यांचा नाबार्ड कडून राष्ट्रीय स्तरावर सन्मान,हिवरगाव पावसा गावाचे देशपातळीवर वाढवला गौरव
हवामान-स्मार्ट शेती (Climate Smart Agriculture) या संशोधन क्षेत्रात केलेल्या नाविन्यपूर्ण व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल

संगमनेर (प्रतिनिधी)– राजहंस दूध संघ चे संचालक प्रमोद पावसे यांचे सुपुत्र व संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील तज्ञ डॉ. प्रणव प्रमोद पावसे यांनी डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील पीएच.डी. संशोधनासाठी नाबार्ड (NABARD) कडून उत्कृष्ट डॉक्टरेट प्रबंध – २०२३ या श्रेणीत राष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्रदान करण्यात आला आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारामध्ये ₹१ लाख रुपये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन डॉ. पावसे यांचा गौरव करण्यात आला. हवामान-स्मार्ट शेती (Climate Smart Agriculture) या संशोधन क्षेत्रात केलेल्या नाविन्यपूर्ण व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. बदलत्या हवामान परिस्थितीत शाश्वत उत्पादन, संसाधन कार्यक्षमता आणि जोखीम कमी करण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरले आहे. डॉ. पावसे यांनी आजपर्यंत १ पेटंट, १ कॉपीराइट, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील २५ संशोधन लेख तसेच २ शैक्षणिक पुस्तके प्रकाशित केली असून, त्यांचे संशोधन कृषी अभियांत्रिकी व हवामान-स्मार्ट शेती क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरत आहे. डॉ. प्रणव पावसे हे हिवरगाव पावसा, तालुका – संगमनेर येथील रहिवासी असून, त्यांच्या पीएच.डी. संशोधनाचे मार्गदर्शन डॉ. सचिन मधुकर नलावडे, सहयोगी अधिष्ठाता, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी केले.
डॉ प्रणव पावसे यांच्या यशाबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्री थोरात, राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हा .चेअरमन राजेंद्र चकोर, पांडुरंग पाटील घुले, ॲड माधवराव कानवडे सौ दुर्गाताई तांबे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव,नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकर सोनवणे, सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे,
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ पावसे,शिवसेना तालुका उपप्रमुख भीमाशंकर पावसे,वृक्षमित्र गणपत पावसे, सोसायटीचे संचालक अशोक भालेराव,सरपंच सेवा संघाचे नेते बाबासाहेब पावसे, देवगड विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा उगले,जि.प. शाळेचे मुख्याध्यापक आर.पी.राहणे, ग्रामसेवक हरिष गडाख, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,शिवसेना मागासवर्गीय सेलचे जिल्हा पदाधिकारी सोमनाथ भालेराव, प्रा.बाबुराव पावसे,केशव दवंगे,गायक हरिश्चंद्र भालेराव, देवगड देवस्थानचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे,अनिल गडाख,संतोष पावसे,पोलीस पाटील माताजी पावसे,तंटामुक्ती समिती अध्यक्ष डॉ.विजय पावसे,जय मल्हार दूध संस्थेचे चेअरमन डॉ.संदीप पावसे,कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव, सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब पावसे यांच्या सह हिवरगाव पावसा गावातील सर्व संस्था पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे मान्यवर, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी, नातेवाईक व ग्रामस्थांनी डॉ. प्रणव पावसे यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या संशोधनामुळे भविष्यात कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.