युवा कार्यकर्ते रुपेश वालझाडे यांचा संगमनेरमध्ये सन्मान; वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

संगमनेर:
संगमनेर येथील तिळवण तेली समाजाचे धडाडीचे युवा कार्यकर्ते, तसेच अहिल्यानगर जिल्हा दैनिक महासभा (उत्तर नगर) चे जिल्हा सचिव श्री. रुपेश वालझाडे यांचा वाढदिवस नुकताच विविध सामाजिक उपक्रमांनी आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने त्यांच्यावर राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांतून शुभेच्छांचा मोठा वर्षाव होत आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून संगमनेर महाविद्यालय येथे सत्कार करण्यात आला. रुपेश भाऊ सध्या संगमनेर महाविद्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून उत्तम प्रकारे काम पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर, साईदृष्टी नेत्रालयचे संचालक डॉ. अमोल वालझाडे, साईसागर क्रिएशनचे संचालक तथा युवा दृष्टी न्यूजचे संपादक श्री. सागर पन्हाळे आणि युवा सामाजिक कार्यकर्ते श्री. संदीप पाबळकर यांच्या वतीने रुपेश भाऊ वालझाडे यांचा वाचनीय पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. रुपेश वालझाडे यांनी तिळवण तेली समाज आणि तैलिक महासभेच्या माध्यमातून उत्तर नगर जिल्ह्यात आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या याच निस्वार्थी आणि सातत्यपूर्ण सामाजिक व प्रशासकीय कार्याची दखल घेत, उपस्थित सर्व मान्यवरांनी आणि मित्रपरिवाराने त्यांच्या भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी
संगमनेर महाविद्यालयातील ज्येष्ठ करवा साहेब तसेच लढ्ढा सर व शिक्षकेतर कर्मचारी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.







