संगमनेर विशेष

जोर्वेत एकलव्य जयंती उत्साहात संपन्न

माजी महापौर सुधाकर सोनवणे यांचा ग्रामस्थांनी केला नागरी सत्कार

संगमनेर प्रतिनिधी / नितीनचंद्र भालेराव

तालुक्यातील जोर्वे गावात वीर एकलव्य यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. संवाद मिरवणुकीत पारंपरिक आकर्षक वेशभूषेत आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक सुधाकर सोनवणे आणि नगरसेविका रंजना सोनवणे यांचा एकलव्य जयंतीचे औचित्य साधून जोर्वे आंबेडकर नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर व एकलव्यांना अभिवादन करून सर्व जोर्वे ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार संपन्न झाला.

नुकताच महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या संगमनेर तालुक्यातील कुरण गावचे सुपुत्र आंबेडकरी चळवळीत मोठ योगदान देणारे नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक सुधाकर सोनवणे व नगरसेविका रंजना सोनवणे यांचा सत्कार शेतकरी संघटनेचे नेते शरद नाना थोरात, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते पॅंथर माणिकराव यादव, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात,अमृतवाहिनी बँकेचे संचालक संजय थोरात,शिर्डी विधानसभा काँग्रेसचे नेते सुरेश थोरात,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बंटी यादव,जोर्वे ग्रामपंचायत सदस्य दिगंबर इंगळे,जोर्वे सोसायटीचे माजी व्हा.चेअरमन ज्ञानदेव पाटील थोरात,
सामाजिक कार्यकर्ते संदीप यादव,रामदास काकड,एकलव्य जयंती समितीचे अध्यक्ष महेंद्र माळी,सत्यजित थोरात,बबन खैरे,भास्कर बर्डे,अमित थोरात,रवींद्र गायकवाड,
बाळासाहेब चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी
मोठ्या संख्येने जोर्वे गावचे ग्रामस्थ व महिला,आदिवासी समाज बांधव,आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.