कला जगतताज्या घडामोडी

रविवारी 8 फेब्रुवारी रोजी रघुवीर खेडकर यांचा भव्य नागरी सत्कार

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांची उपस्थिती

संगमनेर (प्रतिनिधी)–संगमनेर तालुक्याचे भूषण तथा प्रसिद्ध लोककलावंत रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संगमनेर तालुक्यातील सर्वपक्षीय व सर्व नागरिकांच्या वतीने रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वा. कवी अनंत फंदी खुलेनाट्यगृह येथे महाराष्ट्राचे मा. महसूल व शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ विचारवंत प्रा डॉ रावसाहेब कसबे यांच्या शुभहस्ते त्यांना गौरवण्यात येणार असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.

संगमनेर तालुक्यातील तमाम सर्व नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत अधिक माहिती देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, स्वर्गीय कांताबाई सातारकर व रघुवीर खेडकर यांनी संगमनेर तालुक्याचे नाव तमाशा कलेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात नेले. आयुष्यभर तमाशा लोककलेसाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारने नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार संगमनेर तालुक्यासाठी गौरवाचा असून तालुक्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता कवी अनंत फंदी खुणे नाट्यगृह येथे महाराष्ट्राचे माजी शिक्षण व महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ.रावसाहेब कसबे यांच्या शुभहस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी मा आमदार डॉ. सुधीर तांबे , उद्योगपती राजेश मालपाणी, सौ दुर्गाताई तांबे,नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, डॉ जयश्रीताई थोरात, यांच्यासह संगमनेर मधील विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक सांस्कृतिक व सेवाभावी संघटना, सर्व पत्रकार बंधू,कला व क्रीडा रसिक, महिला संघटना सामाजिक कार्यकर्ते युवक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

तरी या भव्य नागरी सत्कार सोहळ्यासाठी संगमनेर मधील सर्व कला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रघुवीर खेडकर गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.