ताज्या घडामोडी

हिवरगाव पावसा गावाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे नेतृत्व

सामाजिक बांधीलकी जपत योगदान व समाजकार्य -हिवरगाव पावसा येथील सिद्धार्थ कृषी सहकारी पाणीपुरवठा योजनेची स्थापना केली.या महाराष्ट्रातील पहिल्या मागासवगय कृषी पाणीपुरवठा योजनेस मंजूरी श्रीकांत भालेराव यांनी मिळवली.संगमनेर येथील प्रवारा नदीतून पाणी उचलण्याचा परवाना मिळवला.सदर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून 235 एकर क्षेत्र ओलिताखाली आले. एकूण 210 सभासद असलेले मागासवगय,बहुजन समाजाची महाराष्ट्रातील सर्वात पहिली पाणीपुरवठा योजना म्हणून ओळखली जाते.सिद्धार्थ कृषी सहकारी पुरवठा योजनेला 50% शासकीय अनुदान मिळवून देण्यास श्रीकांत भालेराव यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. सिद्धार्थ कृषी सहकारी पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन ना.रामदासजी आठवले यांच्या हस्ते संपन्न झाले.सदर उदघाटन सोहळ्यास सहकार महष भाऊसाहेब थोरात यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते. सन 1991 मध्ये देवगड विद्यालयास आठवी व नववीच्या वर्गास आरपीआयच्या कोट्यातून मान्यता मिळवली.हिवरगाव पावसा येथील तालुक्यातील सर्वात मोठे समाज मंदिर दुहेरी अंदाजपत्रक करून ना.रामदास आठवले यांच्या सहकार्याने बांधले.गावच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विविध विकास कामे माग लावले. सन 2003 मध्ये कला सम्राज्ञी पवळा कला मंचाच्या मार्फत श्रीकांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पवळा यांचे नातभाचे कलकथित चांगदेव लहुजी भालेराव यांनी राज्यस्तरीय कलामहोत्सवाचे यशस्वीरित्या आयोजन केले. सदर कला महोत्सव राज्य भरातील तमाशा व नाट्य क्षेत्रातील नामवंत कलावंतांना ना.रामदास आठवले यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.भव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केले. सन 2018 मध्ये श्रीकांत भालेराव यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखाली महात्मा फुले, डॉ.आंबेडकर, राजश्री शाहू विचार मंच संचलित बौद्ध कला सांस्कृतिक प्रशिक्षण केंद्रास भारत सरकारची मंजुरी मिळाली. सदर प्रकल्प सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत बौद्ध तिबेटिया अर्थसाह्य योजनेअंतर्गत मान्यता मिळालेला राज्यातील दुसरा व नगर जिल्ह्यातील पहिला प्रकल्प ठरणार आहे. सदर प्रकल्पाचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम 2024-25 अंतर्गत आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या भव्य सामाजिक सभागृहासाठी वीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या सभागृहाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत पूर्ण करण्यात आले आहे. सदरच्या पवळाबाई सांस्कृतिक सभागृह साठी निधी मंजुरी करिता श्रीकांत भालेराव यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.सदर पवळा सामाजिक सभागृहाचे उद्घाटनाचे ना.रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या काही दिवसांतच संपन्न होणार आहे.

– काशिनाथ पावसे (भाजपा जिल्हा पदाधिकारी)

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.