हनुमान मंदिर सुशोभीकरणासाठी सभापती ना.राम शिंदे यांचा 10 लक्ष रुपये निधी मंजूर

संगमनेर प्रतिनिधी / नितीनचंद्र भालेराव
हिवरगाव पावसा येथील पुरातन हनुमान मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम चालू आहे.मंदिर परिसरात संरक्षण भिंत व पेव्हिंग ब्लॉक सुशोभीकरणासाठी विधानपरिषदेचे सभापती ना.प्रा.राम शिंदे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीमधून 10 लक्ष रुपये मंजूर केले आहे. संगमनेर भाजपा उपाध्यक्ष केशव दवंगे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
मा.जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकारी यांना आपल्या स्थानिक विकास निधीमधून गावातील हनुमान मंदिर येथे संरक्षण भिंत बांधणे व पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामासाठी 10 लक्ष रुपये निधी देण्यासंदर्भात पत्र नामदार राम शिंदे यांनी दिले आहे.त्याबद्दल
भाजपा जिल्हा पदाधिकारी काशिनाथ पावसे,गणेश दवंगे, सरपंच सुभाष गडाख,सुजाता दवंगे,सोमनाथ भालेराव
गणेश पावसे,प्रकाश पावसे,
कैलास दिवटे,किरण पावसे,सुरेश पावसे, मच्छिंद्र पावसे,सचिन सस्कर,चंद्रशेखर गडाख,उत्तम जाधव,विलास पावसे,अशोक पावसे,अशोक गोफणे,बजरंग पावसे,रवींद्र पावसे,किरण पावसे,उत्तम जाधव, दिपक भालेराव,भाऊसाहेब बोऱ्हाडे,
सचिन सस्कर,मच्छिंद्र गडाख,
विनोद पावसे,माधव दवंगे,
बाळासाहेब भालेराव,
सोमनाथ दवंगे,विलास पावसे,
यांच्या सह हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.







