
आजची भारतीय युवा पिढी केवळ संख्येनेच नव्हे तर बौद्धिक सामर्थ्यानेही प्रभावी आहे. तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करणारी ही पिढी जगाशी संवाद साधते, ट्रेंड्स ठरवते आणि समाजात आपले अस्तित्व अधोरेखित करते. पण जेव्हा आपण या पिढीचा राजकीय सहभाग बघतो, तेव्हा अनेक संमिश्र चित्रं समोर येतात. प्रचाराच्या झगमगाटात तरुणांचा सहभाग वाढलेला दिसतो, पण त्यामागे वैचारिक चिकित्सेचा पाया किती खोल आहे, यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. सध्याच्या राजकीय वास्तवात तरुण बहुसंख्य आहेत, मात्र त्यांच्या सहभागामागे भावनिक निर्णय अधिक दिसतो. सोशल मीडियाच्या भडक प्रचारात, झेंड्यांच्या रंगात, सेल्फी-रॅली आणि रील्सच्या जगात वैचारिक स्पष्टता हरवते आहे.

अनेकदा राजकीय पक्ष आपल्या विचारधारेपेक्षा चेहऱ्यांवर, घोषणांवर, आणि विरोधी मतांवरील ट्रोलिंगवर भर देताना दिसतात. या पार्श्वभूमीवर तरुणाई वैचारिक नेता होण्याऐवजी फक्त मतदाता किंवा प्रचारक म्हणूनच वापरली जाते, राजकीय पक्षांकडून स्वतःच्या फायदयासाठी होणार हा तरुणांचा वापर ही चिंतेची बाब आहे. सध्या तर मोबाईलमुळे युवा पिढीस प्रभावीत व विचलित करणे खुप सेपे झाले आहे. आणि हिच गोष्ट आताच्या राजकारण्यांना पक्क ठाऊक आहे. यासाठी ते वेगवेगळया मानसशास्त्रीय तज्ञांचा युवा मनाला दिशाभुल करुन आपली राजकीय पोळी भाजताना बघायला मिळते आहे. डॉ. नरेंद्र जाधव यांनी त्यांच्या ‘लोकशाही आणि तरुणाई’ या पुस्तकात म्हटले आहे की, लोकशाही ही केवळ एक प्रणाली नसून ती मूल्यांची आणि जबाबदाऱ्यांची एक सजीव रचना आहे. ही रचना जिवंत ठेवायची असेल तर तरुणांनी निर्भयपणे प्रश्न विचारायला हवेत, निर्णय घेण्यासाठी माहिती मिळवायला हवी आणि अंधसमर्पण न करता तपासूनच विश्वास ठेवायला हवा. पण दुर्दैवाने आज आपण पाहतो की तरुणांकडून विचाराऐवजी पक्षातील नेत्यांना मोठा दर्जा दिला जातो. उशपीींश षेी ींहश डींवू ेष ऊशशश्रेळिपस डेलळशींळशी (उडऊड) च्या अहवालानुसार, भारतातील 18 ते 29 वयोगटातील 65% तरुण कोणत्याही राजकीय पक्षाशी दीर्घकालीन बांधिलकी ठेवत नाहीत. हा आकडा पहिल्या नजरेत सकारात्मक वाटतो म्हणजे तरुण वैचारिक स्वतंत्रता जपतात. पण प्रत्यक्षात त्यांच्यावर विपुल प्रमाणात सोशल मीडियावरील पेड कंटेंट, प्रोपगंडा आणि भावनिक संदेशांचा प्रभाव पडत आहे. मतदान, टीका, चॅटज, रिल्स, खोटया फेक नरेटीव्ह बातम्या जाणीवपूर्वक प्रसिध्द करुन त्याच भडीमार केला जातो. या पोस्ट्स तथ्यांपेक्षा भावना मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. या प्रवृत्तीमुळे लोकशाहीच्या मुळावर घाव पडतो, कारण विचारवंत मतदारच खऱ्या अर्थाने देश घडवतो. भारतात सध्या या वैचारिक मतदारचे रूपांतर प्रचारअंध व अंधभक्तांमध्ये होतं आहे. तरुणांच्या मनात ठरावीक प्रतिमा, धर्म, किंवा इतिहासाचे विस्कळीत चित्रण वापरून एक विशिष्ट राजकीय निष्ठा निर्माण केली जाते. ही प्रक्रिया जेव्हा वैचारिक मूल्यमापनाशिवाय घडते आहे. शैक्षणिक प्रणालीत नागरिकशास्त्र असलं तरी प्रत्यक्षात नागरिकत्वाबद्दलचे मूल्य, समज, जबाबदाऱ्या यावर फारसं काम होताना दिसत नाही. विद्यार्थ्यांना रोजगारासाठी कौशल्यं शिकवली जातात, पण सजग मतदार म्हणून घडवण्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे मतदान म्हणजे केवळ एक “इव्हेंट“ ठरतं, सेल्फी घेण्याचा क्षण बनतो, लोकशाहीला समजून घेण्याची प्रक्रिया होत नाही. अशावेळी या तरुणांच्या भावनेचा राजकारणी लाभ उठवतात एखादा मुद्दा भावनिकपणे मांडून त्याला आपल्या बाजूने खेचतात. अनेकदा युवक ‘सिस्टमविरोधात’ उभा राहतो, पण कोणत्या प्रणालीविरोधात हे त्यालाही माहित नसतं. ही अर्धवट चळवळ त्याचं राजकीय भान अधिक गोंधळात टाकते. राजकीय पक्षांकडून तरुणांकडे फक्त ‘फुटबॉल’सारखं पाहिलं जातं प्रसंगी खेळवायचं, गरजीनुसार झेंडा बदलायचा, आणि निवडणुका संपल्या की विसरायचं, हा सर्व खेळ वर्षानुवर्ष चालत आला आहे. आणि आही तो सुरु आहे. खरंतर युवाकांनी आपल्या आकलनशक्तीतून प्रश्न विचारले पाहिजेत. युवकांच्या आंदोलनात नैतिकता असेल, तर ते फक्त राजकारणाला नव्हे तर शासनाला सुधारणारी ठरतात. पण त्यात जर केवळ ‘जोश’ असेल आणि ‘होश’ नसेल, तर ती आंदोलने क्षणभंगुर राहतात.आजचा तरुण शिक्षित आहे, पण विवेकी ठरणं यापेक्षा कठीण आहे. माहितीचा महापूर असतानाही तो सत्य ओळखण्यात चुकतो, कारण त्याला त्या माहितीच्या स्त्रोतांवर विश्वास ठेवायला शिकवलं गेलेलं नाही. त्याला विचारायचं शिकवलं नाही, फक्त पटलं पाहिजे हे शिकवलं गेलं. हीच पिढी जर उलटं चालायला लागली, तर समाजही उलट्या दिशेने धावतो.तरुणांनी कोणत्याही पक्षाच्या अंधसमर्पणातून बाहेर येऊन, प्रश्न विचारणं, सत्य तपासणं, धोरणांचा अभ्यास करणं, आणि फक्त घोषणांवर नव्हे तर कृतीवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. एखाद्या उमेदवाराच्या जात, धर्म, किंवा भाषेपेक्षा त्याच्या कामगिरीला महत्त्व द्यावं. त्याचे समाजासाठीचे काम विचारात घ्यावे. जर आपण ठराविक पक्षाने प्रेरित न होता मूल्याने मतदान केले. व योग्य उमेदवारास निवडुन दिले तर तरच लोकशाही बळकट होईल.लोकशाही म्हणजे फक्त मतदान नव्हे, तरी ती चांगला समाज घडविण्यसाठीचा मार्ग ठरावा असे वाटते.जर युवा पिढी सजग नागरिकत्व स्वीकारेल, तर ती केवळ मतदार म्हणून नव्हे, तर मार्गदर्शक, परिवर्तनकर्ता आणि उद्याच्या जबाबदार नेत्याच्या भूमिकेतही उभी राहील. अंधपणे वाहून जाणं ही सहज गोष्ट आहे, पण सजग राहून विचार करणं हेच खऱ्या अर्थाने क्रांतीकारी ठरतं.