देवगड विद्यालयात विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
दामिनी मालिका फेम अभिनेत्री कुमारी किरण पावसे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण

संगमनेर प्रतिनिधी / नितीनचंद्र भालेराव
संगमनेर तालुक्यातील
जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवगड विद्यालय, हिवरगाव पावसा येथे बालगोपाळांचा विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन,सांस्कृतिक कार्यक्रमाचे गुरुवार दि. ८ जानेवारी रोजी सायं.७.३० वा. गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन सह्याद्री वाहिनीवरील दामिनी २.० मालिका फेम अभिनेत्री कुमारी किरण पावसे हिच्या हस्ते होणार आहे.
हिवरगाव पावसा गावाला कला आणि संस्कृती मोठा वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्राच्या लोककलेला लावणीला मोठी उंची मिळवून देणाऱ्या पवळा भालेराव हिवरगावकर यांचे जन्मभूमी म्हणून हिवरगाव पावसा गावाला ओळखले जाते. गाढवाचे लग्न फेम दिवंगत कलाभूषण लहुजी भालेराव तसेच चित्रपट क्षेत्रात कार्यरत असणारे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोडूसर मंगेश भालेराव यांनी आपल्या टायगर पॉज फिल्म कंपनीच्या माध्यमातून
शेकडो चित्रपट निर्मिती केली आहे. त्यानंतर छोटा पडद्यावर आपल्या अभिनयाची मोठी छाप पाडणाऱ्या हिवरगाव पावसा गावची सुकन्या कुमारी किरण पावसे हिने दामिनी मालिका 2.0 च्या माध्यमातून गावाचे नाव कला क्षेत्रात उंचावले आहे.
अभिनेत्री कुमारी किरण पावसे हिच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाची उत्सुकता पंचक्रोशीत विद्यार्थी, नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
सदर कार्यक्रमास जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी,हिवरगाव पावसा व पंचक्रोशीतील सर्व संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ,पालक व माजी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.शालेय विद्यार्थ्यांना व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हिवरगाव पावसा व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन देवगड माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा उगले यांच्या सह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी केले आहे.







