स्वीकृत नगरसेवकपदी निवडी बद्दल सोमेश्वर दिवटे यांचा संताजी युवा मंच संगमनेर तर्फे सत्कार
तेली समाजातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण

संगमनेर प्रतिनिधी |
संगमनेर नगर परिषदेच्या ऐतिहासिक निकालानंतर शहराच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात बदलाची चाहूल लागली आहे. या पार्श्वभूमीवर युवक नेतृत्वाला मिळालेली संधी ही केवळ पदापुरती मर्यादित न राहता, शहराच्या भविष्यातील विकासाचा आराखडा ठरवणारी ठरू शकते. तेली समाजातील युवा सक्रिय आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या सोमेश्वर दिवटे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याने शहरातील विविध घटकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
दिवटे यांची निवड ही नव्या पिढीच्या अपेक्षा आणि प्रशासनातील जबाबदाऱ्या यांचा संगम मानला जात आहे. शहरातील पायाभूत सुविधा, नागरी प्रश्न, युवकांच्या संधी, तसेच सामाजिक समतोल या सर्व आघाड्यांवर सकारात्मक हस्तक्षेप करण्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. संगमनेरच्या विकासाला नवी दिशा देण्याची क्षमता या नेतृत्वात असल्याचे मत अनेक जाणकारांकडून मांडले जात आहे.
या निवडीबद्दल संताजी युवा मंच, संगमनेर यांच्या वतीने दिवटे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी मंचातील युवकांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, तेली समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी दिवटे यांचे नेतृत्व निर्णायक ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
सत्कारप्रसंगी डॉ. अमोल वालझाडे, विशाल वालझाडे, महेश वाव्हळ, सागर पन्हाळे, संदीप पाबळकर, सागर कर्डिले यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते. संताजी युवा मंचतर्फे दिवटे यांना त्यांच्या पुढील सार्वजनिक व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
शहराच्या विकास प्रक्रियेत युवक नेतृत्वाला मिळालेली ही संधी संगमनेरकरांसाठी आनंदाची बाब ठरत आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.