शैक्षणिक विशेष

सह्याद्री प्राथमिक विद्या मंदिरातील ‘स्वधा महोत्सव’ ठरला आनंदाचा सोहळा

“स्वधेतून संस्कार, संस्कारातून संस्कृती”

सह्याद्री प्राथमिक विद्या मंदिरातील ‘स्वधा महोत्सव’ ठरला आनंदाचा सोहळा 🌼
सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाजाच्या सह्याद्री प्राथमिक विद्या मंदिर (बालवाडी विभाग), संगमनेर येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना बहर देणारा, संस्कारांची पाळेमुळे घट्ट करणारा आणि पालक-शाळा नात्याला नवे बळ देणारा “स्वधा महोत्सव” हा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

विद्यार्थ्यांना व्यासपीठ देणे, आत्मविश्वास वाढवणे, सर्जनशीलतेला चालना देणे, सहकार्य व संघभावना रुजवणे या उदात्त हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्य, गीत, अभिनय व विविध कलाप्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली. निरागस हसरे चेहरे, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि टाळ्यांचा कडकडाट—यातूनच कार्यक्रमाचे यश अधोरेखित झाले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणावर पालकांनी केलेला बक्षिसांचा वर्षाव हा त्यांच्या वाढत्या सहभागाचा व प्रेमाचा प्रत्यय देणारा ठरला.

“वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त कला-गुणांना वाव देणे” या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात शाळेचे ब्रीदवाक्य “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” प्रत्यक्ष कृतीतून अनुभवायला मिळाले. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी व सर्वांगीण विकास देण्याचे शाळेचे धोरण या महोत्सवातून ठळकपणे समोर आले.

“समाजसेविका आपल्या दारी..!” या उपक्रमांतर्गत शिक्षण व समाजसेवा क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक सौ. अरुणाताई रमेश घोलप ( संस्थापक व अध्यक्ष, अखिल भारतीय लायनेस क्लब स्वामिनी, संगमनेर) यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व विशद करत त्यांनी शाळेच्या कार्याचा व सेवकांच्या योगदानाचा गौरव केला.

याप्रसंगी स.ब.वि.प्र. संस्थेचे ज्येष्ठ संचालक तथा आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात सर यांनी पालक-विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत ‘स्वधा महोत्सव’चे मनःपूर्वक कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मा. राजाभाऊ अवसक (कार्यकारी विश्वस्त, माजी राज्याध्यक्ष, राष्ट्र सेवा दल) यांच्यासह सन्मा. संदिप ऊर्फ दुर्गेश मधुकर कडलग, ॲड. सागर शिंदे साहेब, मा. प्रशासनाधिकारी श्री. भालारे साहेब यांनी विद्यार्थ्यांना बोधात्मक संदेश देत शुभेच्छा दिल्या.

पालक प्रतिनिधी म्हणून डॉ. पुष्पाताई हांडे, कपिल केशव दिघे, पुर्वा सतीश गुळवे, संध्याताई बढे यांनी मनोगते व्यक्त करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

संस्थेचे मार्गदर्शक मा. महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, चेअरमन मा. आमदार डॉ. सुधीरजी तांबे साहेब तसेच संगमनेर शहराच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी ‘ स्वधा महोत्सव’स विशेष शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय वर्पे यांनी केले. पर्यवेक्षिका शामल धिमते यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्साही व प्रभावी सूत्रसंचालन विजया जाधव यांनी केले, तर आभारप्रदर्शन अर्चना धिमते यांनी केले. सोशल मिडियासाठी युवादृष्टीचे मुख्य संपादक सागर पन्हाळे यांनी सहकार्य केले. तसेच यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.