सौ. दिपाली पांचारीया यांची नगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड
उपनगराध्यक्षपदाची निवड 13 जानेवारी रोजी होणार

जिल्हाधिकारी कार्यालय येथे संगमनेर नगर परिषदेच्या संगमनेर सेवा समितीच्या वतीने नोंद करण्यात आली यावेळी गटनेतेपदी सौ दिपाली जीवन पांचारिया यांची निवड करण्यात आली तर उपघटनेतेपदी सौरभ विवेक कासार यांची निवड करण्यात आली.
सेक्रेटरी पदी लाला मुजीब खान यांची तर खजिनदारपदी भारत बोराडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
संगमनेर मधील सर्व नागरिकांनी राजकारण विरहित एकत्र येऊन संगमनेर सेवा समिती स्थापन केली आणि या सेवा समितीने संगमनेर 2.0 ही संकल्पना राबवत घवघवीत यश मिळवले. निवडणुकीनंतर सर्वांना सोबत घेत लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियानातून प्रारंभ केला याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने पदग्रहण समारंभ संपन्न झाला यावेळी शहरातील नागरिकांनी मोठा आनंद उत्सव साजरा केला.
गटनेतेपदी सौ. दिपालीताई पांचारीया यांच्या निवडीबद्दल मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, डॉ जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉ मैथिलीताई तांबे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, ॲड सुहास आहेर, यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
——————-
13 जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष पदाची निवड होणार
संगमनेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवड मंगळवार दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी दुपारी साडेबारा वाजता नगरपालिकेच्या रामकृष्णदास सभागृह येथे नगराध्यक्ष डॉ मैथिलीताई सत्यजित तांबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.







