ताज्या घडामोडी

संगमनेर शहरातील अमली पदार्थांची तस्करी व गुन्हेगारी तातडीने थांबवा महिला पदाधिकारी आक्रमक,

संगमनेर (प्रतिनिधी)–लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर ही विकसित यांनी वैभवशाली शहर म्हणून ओळखले जाते मात्र मागील एक वर्षापासून संगमनेर शहरांमध्ये अमली पदार्थांची तस्करी गुन्हेगारी दहशत चोऱ्या यांचे प्रमाण वाढले असून हे तातडीने थांबवा अशी मागणी सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी संगमनेर पोलीस स्थानक येथे केली आहे.

नगराध्यक्ष डॉ मैथिलीताई तांबे व माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरातील विविध महिलांनी शहर पोलीस निरीक्षक बारवकर यांना याबाबतचे निवेदन दिले. यावेळी सौ. दिपाली पंचारिया, सरोजिनी पगडाल, वनिता गाडे, नंदा गरुडकर, अनुराधा सातपुते, सीमा खटाटे, विजया गुंजाळ, मंगल कासार ,सौ सुषमा भालेराव ,सौ मीना सोसे, उज्वला पगार ,मुमताज सौदागर, शोभा तुपे, मोहिनी बनसोडे, वैशाली कोल्हे ,सोनिया थोरात, शिवानी गाडे, सुविधा आरसिद्ध, सुनीता कांदळकर, वर्षा भोंडे, मनीषा शिंदे , ज्योती दारोळे , कीर्ती मुळे, दीपा कलंत्री, मीनल निऱ्हाळी,कल्पना कुटे ,स्नेहलता एखंडे, कोमल दायमा यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या निवेदनात म्हटले आहे की,  संगमनेर शहरामध्ये सध्या अमली पदार्थांचा अवैध व्यवसाय  मोठ्या प्रमाणात वाढलेला असून यामुळे शहरातील तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवणे, पेट्रोलिंगची राऊंड वाढवणे, संशयित व्यक्तींवर सातत्याने लक्ष ठेवणे तसेच अमली पदार्थाची अवैध विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच शहरात मागील काही दिवसांपासून चोरी मारहाण व दहशत निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असून चोरीच्या गंभीर घटना घडत आहे. यामुळे महिलांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे  अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची जिल्ह्यात व राज्यात वेगळी ओळख आहे. मात्र अलीकडच्या काळात गुन्हेगारी वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. सध्या शहरात गुन्हेगारी ,अमली पदार्थांची तस्करी, चोरी अशा घटना रासरोसपणे घडत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. पोलीस प्रशासनाने या तातडीने लक्ष घालून दोषी व्यक्तींवर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे.

हे निवेदन पोलीस निरीक्षक बारवकर यांनी स्वीकारले व तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.