संगमनेर विशेष

पुस्तकाने आपले मस्तक सुधारते, जितके शिकाल , तितके बघाल – अरविंद गाडेकर

" रेषा बोलतात . . . रेषा हसवतात "

संगमनेर –  ” पुस्तकाने मस्तक सुधारते , सुधारलेले मस्तक कुणाचे हस्तक बनत नाही आणि लाचारीने कुणापुढे नतमस्तकहि होत नाही.  पुस्तक आपले जीवन समृद्ध करते आणि आपण जीवन कसे जगावे हे शिकविते.   जी जी मोठी माणसे झाली आहेत त्यांनी खूप पुस्तके वाचली आहेत.  आजच्या मोबाईलच्या क्रांतीने वाचनापासून विद्यार्थी दूर गेला आहे. तो टच स्क्रिनच्या आहारी गेला आहे.  त्याचा बाह्य दुनियेशी संवाद, संपर्क तुटला आहे. परिवारातील व्यक्तींशीही त्याचा संवाद नाही . त्यामुळे अनेक रोगांचा तो शिकार बनला आहे. विद्यार्थ्यांना जे अपयश आले , ज्या प्रश्नांनी त्याला सतावले आहे त्या समस्या त्याने कुटुंबासमवेत व्यक्त करायला हव्यात. त्यामुळे त्याचे मनावरील दडपण, भीती दूर होईल.  पुस्तकाचे वाचनासाठी अनेक अँप्स आहेत, मोबाईलचा वापर पुस्तकांच्या वाचनासाठी करायला हवा. अनेक नामवंत लेखकांची पुस्तके तुम्हाला वाचायला मिळतील. विद्यार्थ्यांनी अनेक चुकीच्या सवयी बदलायला पाहिजे आणि चुका सुधारून पुन्हा चांगल्या सवयीने सुरवात करावी. कृतीतून त्यांनी येणाऱ्या समस्या, अडचणींवर मात करायला हवे. ” असे उद्गार अरविंद गाडेकर यांनी काढले.
आबासाहेब काकडे महाविद्यालय बोधेगाव , तालुका – शेवगाव ,आणि बहिःशाल शिक्षण मंडळ सावित्रीबाई फुले महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” रेषा बोलतात . . . रेषा हसवतात ” या कार्यक्रमात अरविंद गाडेकर यांनी व्यंगचित्रातून विद्यार्थ्यांना प्रबोधन केले.  त्यांनी व्यंगचित्रातून विद्यार्थ्यांना हसविले आणि प्रत्येक व्यंगचित्रातून संदेश दिला.  पुस्तक वाचनाचे, व्यायामाचे महत्व समजून सांगितले . मोबाईलचे दुष्परिणाम , व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूण हत्या, शिक्षण काळाची गरज  आणि अनेक विषयावर विद्यार्थ्यांना अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन केले.
     या कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. के. फसले, बहि:शाल शिक्षमंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे केंद्रप्रमुख डॉ. सलमानअली मिर्झा, प्रा. हेमंत गांगुर्डे, प्रा. डॉ. अश्विनी उगले आणि विद्यार्थी उपस्थित होते.
SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.