ताज्या घडामोडी

दुर्दैवी! आजीच्या डोळ्यांदेखत नातवाला ओढून नेलं; बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय लेकराचा करुण अंत, अख्खं गाव सुन्न

जवळे कडलग (ता. संगमनेर ) येथील सिद्धेश सूरज कडलग (वय 6) या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

काय घडलं?
कडलग यांची गावाजवळ शेती आहे. त्यांचा दुग्धव्यवसाय असल्याने शेतात चारा पीक लावलेले आहे. आजी गवताचे ओझे घेऊन गोठ्यात गेली. त्यावेळी सिद्धेश दारात उभा होता. त्याला बघून पिकात लपून बसलेल्या बिबट्याने अचानाक त्याच्यावर हल्ला केला. त्याला उचलून गवतात नेले. हा प्रकार त्याच्या आजीच्या लक्षात आला. तिने आरडाओरड केल्याने कुटुंबातील सर्व जण तिकडे धावले. बिबट्या सिद्धेशला तेथेच टाकून पळून गेला. चिमुकल्याला असं रक्तबंबाळ अवस्थेत बघून आजीने हंबरडा फोडला. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते.

अखेर बिबट्या जेरबंद

सिद्धेशच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. बिबट्याला ठार करेपर्यंत मुलाचा मृत्यदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. अखेर वनविभागाने बिबट्याला बघता क्षणी ठार करण्याचे आदेश दिले होते. कालपासून सुरु असलेल्या शोधमोहिमेनंतर नरभक्षक बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अखेर यश आले. पण लेकराचा जीव गेल्याने अख्खं गाव अजूनही सुन्न आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.