संगमनेर विशेष

तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत सह्याद्री प्राथमिक विद्यालयाचे दैदीप्यमान यश; कार्तिक देशमुख, आर्णव तनपुरे प्रथम

संगमनेर: प्रतिनिधी शारदा शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित स्व. ओंकारनाथजी मालपाणी तालुकास्तरीय सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा-२०२६ मध्ये संगमनेरच्या सह्याद्री प्राथमिक विद्या मंदिराने घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेतील गट क्रमांक १ (इयत्ता ३ री व ४ थी) मध्ये शाळेचे विद्यार्थी कुमार कार्तिक राहुल देशमुख आणि कुमार आर्णव अर्जुन तनपुरे यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा आणि चिकाटीचा परिचय देत प्रथम क्रमांक पटकावला.

संस्थेचे चेअरमन स्व. ओंकारनाथजी मालपाणी यांच्या २१ फेब्रुवारी या जन्मदिनाचे औचित्य साधून हा दिवस ‘प्रेरणादिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने दरवर्षी प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या स्पर्धेत सह्याद्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक शिक्षकांच्या मदतीने आणि पालकांच्या पाठिंब्याच्या जोरावर हे यश मिळवले असून, शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक, ट्रॉफी आणि रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या भविष्यातील सर्वांगीण विकासासाठी हे यश प्रेरणादायी ठरणार असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.

अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार, दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता संपन्न होणार आहे. या दैदीप्यमान यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे आणि पालकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.