महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर संगमनेरमध्ये ‘गुरु रामदास’ कापड दुकानाचे थाटात आगमन; साड्यांचा महासेल धमाका!

संगमनेर: प्रतिनिधी येत्या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर संगमनेरकरांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन ‘गुरु रामदास होलसेल कापड दुकान’ सज्ज झाले आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेत, मेनरोडवर ईश्वर सायकल शेजारी या नवीन दालनाचा शुभारंभ होत असून, त्यानिमित्त आयोजित ‘साड्यांचा महासेल धमाका’ ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सुरू होणाऱ्या या सेलमध्ये महिला वर्गासाठी अत्यंत नाविन्यपूर्ण ‘शुभारंभ स्पेशल ऑफर’ जाहीर करण्यात आली आहे. दुकानातून केवळ ११३ रुपयांची खरेदी करणाऱ्या ग्राहकाला परकर अवघ्या १३ रुपयांत उपलब्ध करून दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, ही योजना शुभारंभानंतरच्या पहिल्या १३ दिवसांसाठी लागू असेल आणि दररोज प्रथम येणाऱ्या १३ ग्राहकांना या सवलतीचा लाभ घेता येईल.
या सेलचे दुसरे मोठे आकर्षण म्हणजे पैठणी साड्यांवरील अभूतपूर्व सूट. सण आणि लग्नसराईसाठी पसंतीस उतरणाऱ्या, ज्या पैठणी साड्यांची बाजारभाव किंमत २ हजार ते ५ हजार रुपयांच्या घरात असते, त्या साड्या येथे केवळ ५९० ते ९९० रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहेत. होलसेल दरामध्ये सर्वसामान्यांना दर्जेदार साड्या मिळाव्यात, हा या महासेलचा मुख्य उद्देश आहे.
भक्ती आणि उत्साहाच्या महाशिवरात्री उत्सवात ग्राहकांना आपल्या आवडीच्या साड्यांची खरेदी किफायतशीर दरात करता यावी, यासाठी गुरु रामदास कापड दुकानाने जय्यत तयारी केली आहे. संगमनेर शहरात प्रथमच अशा प्रकारचा भव्य सेल आणि ऑफर्सचा धमाका येत असल्याने, ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.







