संगमनेर विशेष

संघर्षशील लढाऊ नेतृत्व : श्रीकांत भालेराव – आशिष शेळके , संगमनेर तालुका अध्यक्ष RPI

आंबेडकर चळवळीतील लढाऊ पँथर – अहिल्या नगर जिल्ह्यातील जुन्या पिढीतील उत्कृष्ट संघटक व अभ्यासू नेतृत्व ज्येष्ठ नेतृत्व म्हणून ओळखले जाते.आंबेडकर चळवळीतील आरपीआय (आठवले)जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे व निष्ठेने जबाबदारी पार पाडत आहे.पँथर सारख्या लढाऊ संघटने पासून नामांतराचा लढा, विविध सामाजिक आंदोलने,बहुजन समाजातील प्रश्नांवर लढा,कोरोना काळातील गोरगरिबांना संघटनेच्या मार्फत अन्नधान्य गरजेच्या वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी मोठ्या प्रमाणात जपण्याचे प्रयत्न केला.कोरोना काळात मुंबईवरून येऊन गावाकडे थांबले.या कालावधीत समाजाशी सतत संपर्क साधून होते. या काळात मोठमोठे लोक,पुढारी घरात बसून होते.परंतु श्रीकांत भालेराव हे गावोगावी खेडोपाडी,वाड्या वस्तीवर बहुजन समाजात,मागासवगय वस्त्यांवर जाऊन धीर देत होते.कोरोनाला घाबरू नका, सावधगिरी बाळगा,वाचला तर पुढे आणखी लढता येईल असा संदेश देत तरुणांमध्ये जनजागृती करत होते. शिवराय-फुले- शाहु- आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार केला,या काळातही अहिल्या नगर जिल्ह्यात मोठे संघटन उभे केले.रिपब्लिकन पाट ऑफ इंडिया(आठवले)यांच्या शेकडो शाखांचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाले.त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात असंख्य कार्यकर्ते निर्माण झालेत.असे कार्यकर्त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारे नेतृत्व रिपब्लिकन चळवळीत सर्व परिचित आहे. म्हणूनच त्यांना कार्यकर्ते घडविणारे नेतृत्व म्हटले जात आहे. अशा नेतृत्वाला उदंड आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा तसेच भावी वाटचालीसाठी मंगल कामना..

 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.